Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / NRMU ला मोठा धक्का; ४५० कार्यकर्त्यांचा CRMS मध्ये जाहीर प्रवेश

NRMU ला मोठा धक्का; ४५० कार्यकर्त्यांचा CRMS मध्ये जाहीर प्रवेश

Bureau Report Akash Dhake | Bhusawal News | Khabar 24 Express

नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (NRMU) ला मोठा धक्का बसला असून, संघटनेचे मंडल अध्यक्ष मा. पुष्पेंद्रजी कापडे यांनी आपल्या ४५० कार्यकर्त्यांसह सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघात (CRMS) जाहीर प्रवेश केला आहे.


हा प्रवेश सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष मा. प्रविणजी बाजपेई यांच्या अध्यक्षतेखाली बऱ्हाणपूर येथे आयोजित कार्यक्रमात पार पडला. या वेळी CRMS संघटनेची ध्येयधोरणे, कामगार हितासाठीची लढाऊ भूमिका व पारदर्शक नेतृत्वामुळे आम्ही CRMS मध्ये प्रवेश करत असल्याचे कापडे यांनी सांगितले.


प्रविणजी बाजपेई यांनी सर्व नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत कामगारांच्या हक्कांसाठी संघटना अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.


या प्रवेशामुळे रेल्वे कामगार संघटनांच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून, NRMU साठी हा मोठा राजकीय व संघटनात्मक धक्का मानला जात आहे.
जय CRMS | जय तिरंगा | जीत तिरंगा

Bureau Report : Akash Dhake


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading