Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळात आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त मंत्र्यांच्या उपस्थितत ‘योग संगम’ कार्यक्रम

भुसावळात आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त मंत्र्यांच्या उपस्थितत ‘योग संगम’ कार्यक्रम

भुसावळात आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त मंत्र्यांच्या उपस्थितत ‘योग संगम’ कार्यक्रम

मंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीष महाजन व मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून “एक पृथ्वी, एक स्वास्थ्य के लिए योग” या धरतीवर या वर्षीचा ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त आयुष मंत्रालय, भारत सरकार, सेंट्रल रेल्वे, भुसावळ विभाग व जिल्हाधिकारी जळगाव आणि भारतीय खेळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेत “योग संगम” कार्यक्रमाचे, भुसावळ येथील सेन्ट्रल रेल्वे मैदान येथे आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास जलसंपदा मंत्री गिरीष महाजन व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे, जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल, भारतीय खेळ प्राधिकरण क्षेत्रीय निदेशक पांडुरंग चाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.


सदर ‘योग संगम’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी आवाहन केले असता कार्यक्रमास जवळजवळ २५०० नागरिकांनी सहभाग घेतला. सकाळपासूनच मोठ्या संख्येने योगप्रेमी या शिबिरात उपस्थित होते आणि त्यांनी योगासन आणि प्राणायामचा सराव केला. उपस्थित मान्यवरांनी यावेळी योगाचे महत्त्व स्पष्ट केले आणि निरोगी जीवनासाठी योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमामुळे नागरिकांमध्ये योगाबद्दल जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत झाली.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe