Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / धरती आबा जनभागीदारी अभियान” रथास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दाखविला हिरवा झेंडा

धरती आबा जनभागीदारी अभियान” रथास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दाखविला हिरवा झेंडा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार अनुसूचित जाती बहुल गावांमध्ये “धरती आबा जनभागीदारी अभियान” हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. धरती आबा जनसहभाग अभियान योजना १५ जून ते ३० जून दरम्यान संपूर्ण देशात राष्ट्रीय पातळीवर मिशन मोडमध्ये राबविली जात आहे. अनुसूचित जाती समुदायांना सरकारी योजनांचे योग्य फायदे उपलब्ध करून देणे आणि त्यांना त्यांच्या हक्कांची आणि कल्याणकारी योजनांची जाणीव करून देणे हा यामागचा उद्देश आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे आज केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांनी “धरती आबा जनभागीदारी अभियान” रथास हिरवा झेंडा दाखवून रवाना केले, तसेच अभियान बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी योजना योग्यरित्या राबविणे बाबत सबंधित अधिकाऱ्यांना योग्यत्या सूचना करण्यात आल्या.
देशभरात अनुसूचित जाती बहुल गावांमध्ये विशेष लाभ संतृप्ति शिबिरे सातत्याने आयोजित केली जात असून, आदिवासी समुदायातील मोठ्या संख्येने लोक त्यांचे अर्ज घेऊन अभियानात सहभागी होत आहे. सार्वजनिक सहभागाला प्रोत्साहन देणाऱ्या या मोहिमेचा उद्देश वंचित वर्गाला सरकारी योजनांसोबत जोडून मुख्य प्रवाहात आणणे आहे. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारद्वारे आतापर्यंतची सर्वात मोठी जनजाती आंदोलन मोहीम सुरू केली गेली आहे. क्रांतिकारी जननायक बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती निमित्त केंद्र सरकार आदिवासी गौरव वर्ष साजरे करत असून हा यातील एक प्रमुख उपक्रम आहे. भारतातील लोकांच्या वारसा, संस्कृती आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी आदिवासी अभिमान वर्ष सुरू करण्यात आले आहे.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल इ. प्रमुख उपस्थितीत होते.

ब्यूरो रिपोर्ट : आकाश ढाके


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading