Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / जळगाव शहरातील सिंधी काॅलनी मध्ये अंदाजे ६ – ७ लाखांचा गुटखा जप्त

जळगाव शहरातील सिंधी काॅलनी मध्ये अंदाजे ६ – ७ लाखांचा गुटखा जप्त

जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या सिंधी कॉलनी मध्ये पोलिसांनी धाड टाकून अंदाजे सात लाख रुपयाचा गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे शहरांमध्ये गुटख्याची तस्करी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये अंदाजे ६ ते ७ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. गुटखा मालाचे दुकान व गोडाऊन पोलिसांनी सील केले आहे. यातील मुख्य संशयित आरोपी दीपक चेतवानी व रमेश चेतवानी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. शहरामध्ये अजून कोणी चोरुन लपुन गुटखा विक्री करीत आहे का ? या संशयित आरोपींचे अजुन कोणाशी गुटखा विक्री बाबत व्यवहार आहेत का याचा पोलीस कसुन तपास करीत आहेत.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, जळगाव


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

NEET Paper Leak: बढ़ते दबाव के बीच केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा, मोदी सरकार का बड़ा फैसला

NEET Paper Leak: बढ़ते दबाव के बीच केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा, मोदी सरकार का बड़ा फैसला

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading