Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

भुसावळ शहरातील तापमान ४५ अंशांच्या पुढे गेल्याने नागरिकांसह पशु-पक्ष्यांनाही तीव्र उन्हाचा फटका बसत आहे. पाण्याच्या शोधात पक्ष्यांची होणारी वणवण लक्षात घेऊन येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘जीव दया जल सेवा’ अभियान राबवत माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे.
या उपक्रमांतर्गत शाळेच्या प्राचार्या नीना कटलर, उपप्राचार्या मनप्रीत कौर अरोडा व श्रद्धाली घुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शाळेच्या गच्चीवर तसेच परिसरातील झाडांवर व झाडाखाली मातीची भांडी ठेवली आहेत. या भांड्यांमध्ये दररोज स्वच्छ पाणी भरले जात असून पक्ष्यांच्या पिण्याची व आंघोळीची उत्तम सोय करण्यात आली आहे.
या उपक्रमासाठी व्हॉईसप्रिंसिपल श्रद्धाली घुले, मनप्रीत कौर, मुकेश कोळी, आकाश परदेशी, डॅनियल पवार, महेंद्र सूर्यवंशी, सोनाली मुजुमदार आणि हर्षला पाटील यांचे सहकार्य लाभले. ताप्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे शहरभर कौतुक होत आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7