Breaking News
BigRoz Big Roz
Home / खबरें / गंगाराम प्लॉट परिसरात होल्टेजचा गंभीर प्रश्न; महावितरणकडून दुर्लक्ष

गंगाराम प्लॉट परिसरात होल्टेजचा गंभीर प्रश्न; महावितरणकडून दुर्लक्ष

भुसावळ : गंगाराम प्लॉट परिसरात महाराणा प्रताप विद्यालयाच्या मागील बाजूस केबल टाकण्याचे काम सुरू होते. सदर केबल टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील जवळपास सर्व घरांमध्ये वीज होल्टेज कमी–जास्त होण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

होल्टेजच्या या सततच्या चढ-उतारामुळे नागरिकांचे विद्युत उपकरणे खराब होण्याची भीती निर्माण झाली असून दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे.

या संदर्भात नागरिकांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या, मात्र दोन ते तीन दिवस उलटूनही अद्याप कोणतेही ठोस निवारण करण्यात आलेले नाही.

महावितरणच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, तात्काळ तांत्रिक तपासणी करून होल्टेजचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी जोरदार मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

रावेर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रक्षाताई खडसे यांची आढावा बैठक

रावेर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रक्षाताई खडसे यांची आढावा बैठक

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading