Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / रावेर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रक्षाताई खडसे यांची आढावा बैठक

रावेर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रक्षाताई खडसे यांची आढावा बैठक

Jalgaon News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

रावेर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत रेल्वे विभागामार्फत विविध विकास प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, या प्रकल्पांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे.

यामध्ये जामनेर–पाचोरा–बोदवड या वाढीव रेल्वे मार्गासह भुसावळ–खंडवा तिसरी व चौथी रेल्वे लाईन या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या कामांमुळे अनेक शेतकरी बाधित झाले असून त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.


या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आज वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे, जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे तसेच रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची आढावा बैठक घेतली.

बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या सविस्तरपणे जाणून घेत त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.


विशेषतः बोदवड व भुसावळ तालुक्यांतील तसेच वरणगाव परिसरातील रेल्वे रुळालगत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आरओबी (रेल्वे ओव्हर ब्रिज) व आरयूबी (रेल्वे अंडर ब्रिज) उभारणी, शेतात जाण्यासाठी स्वतंत्र रस्त्यांची सुविधा तसेच पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याबाबत ठोस निर्देश देण्यात आले.


रेल्वे विकासकामांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेऊन त्यांच्या अडचणी सोडविणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे यावेळी श्रीमती खडसे यांनी स्पष्ट केले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, जळगाव


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- ‘बात बंद कर दी थी’, एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- 'बात बंद कर दी थी', एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading