
भुसावळ शहर व तालुक्यात आज बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून सकाळपासूनच विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची लगबग पाहायला मिळाली.
परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांवर शांत व शिस्तबद्ध वातावरण होते. विद्यार्थी एकाग्रतेने पेपर सोडवताना दिसून आले. कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक तसेच भरारी पथकाकडून कडक नजर ठेवण्यात आली होती.
मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साधने यांवर सक्त बंदी घालण्यात आली होती.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षा केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता तसेच आवश्यक सूचना फलक लावण्यात आले होते.
बारावीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने विशेष महत्त्व असल्याने विद्यार्थी आत्मविश्वासाने परीक्षा देत असल्याचे चित्र होते. परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7