Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळ विभागाची विनातिकीट प्रवाशांविरुद्ध कठोर कारवाई; 8.18 लाख प्रकरणांतून 68.86 कोटींचा दंड वसूल

भुसावळ विभागाची विनातिकीट प्रवाशांविरुद्ध कठोर कारवाई; 8.18 लाख प्रकरणांतून 68.86 कोटींचा दंड वसूल

भुसावळ रेल्वे विभागात अनधिकृत व विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून, आर्थिक वर्ष 2025-26 (एप्रिल 2025 ते जानेवारी 2026) या कालावधीत तब्बल 8.18 लाख प्रकरणांतून 68.86 कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल करण्यात आला आहे.


प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व आरामदायी प्रवास सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या भुसावळ विभागाने तिकीट तपासणी मोहिमा अधिक प्रभावी व नियोजनबद्ध पद्धतीने राबविल्या.

त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले असून, मागील आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 5.82 लाख प्रकरणे नोंदवली गेली होती. त्या तुलनेत यंदा सुमारे 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


दंड वसुलीच्या बाबतीतही लक्षणीय वाढ झाली असून, 2024-25 मध्ये 42.87 कोटी रुपये वसूल झाले होते. त्यामानाने यंदा 61 टक्क्यांहून अधिक वाढीसह 68.86 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.


अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी भुसावळ विभागाने स्थानक तपासणी, अचानक तपासणी, किल्ला (फोर्ट्रेस) पद्धतीची तपासणी, सखोल तपासणी तसेच मेगा तिकीट तपासणी मोहिमा राबविल्या. या मोहिमा मेल/एक्सप्रेस, प्रवासी तसेच विशेष गाड्यांमध्ये नियमितपणे घेण्यात आल्या.


दरम्यान, भुसावळ रेल्वे विभागाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकी, एटीव्हीएम, रेल्वे ॲप किंवा IRCTC संकेतस्थळावरून अधिकृत व वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा.

योग्य तिकीट न घेतल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

रावेर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रक्षाताई खडसे यांची आढावा बैठक

रावेर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रक्षाताई खडसे यांची आढावा बैठक

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading