Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळ: जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, परिसर भक्तिमय

भुसावळ: जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, परिसर भक्तिमय

भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळी लवकरपासूनच शहरासह तालुका आणि परिसरातील भाविकांनी मंदिरात हजेरी लावत गजानन महाराजांचे दर्शन घेतले.

भाविकांनी शिस्तबद्ध रांगा लावून भक्तिभावाने दर्शन घेतले. मंदिर परिसरात “गण गण गणात बोते” या नामस्मरणाचा जयघोष सुरू असल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता.

दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये कुटुंबांसह आलेले श्रद्धाळू, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती.

अनेक भाविकांनी अभिषेक, पूजाअर्चा तसेच नैवेद्य अर्पण करून श्री गजानन महाराजांचे आशीर्वाद घेतले. उत्साह, श्रद्धा आणि शिस्त यांचे उत्तम दर्शन मंदिर परिसरात घडत होते.

दर्शन व्यवस्थेसाठी मंदिर प्रशासन व स्वयंसेवकांकडून आवश्यक ती काळजी घेण्यात आली होती.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

रावेर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रक्षाताई खडसे यांची आढावा बैठक

रावेर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रक्षाताई खडसे यांची आढावा बैठक

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading