Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत ताप्ती पब्लिक स्कूलची दक्षायणी सपकाळे राज्यात प्रथम

डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत ताप्ती पब्लिक स्कूलची दक्षायणी सपकाळे राज्यात प्रथम

मुंबई येथे सन २०२५–२६ मध्ये डॉ. होमी भाभा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल वैज्ञानिक स्पर्धेत भुसावळ येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी दक्षायणी सुबोध सपकाळे हिने ग्रेट लेव्हल–२ चे प्रमाणपत्र मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.


ही स्पर्धा मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने घेण्यात आली होती.

या स्पर्धेत देशभरातून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. दक्षायणीने आपल्या वैज्ञानिक विचारसरणी व कौशल्याच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी करत ग्रेट लेव्हल–२ प्रमाणपत्र व शिल्ड मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.


दक्षायणी ही ताप्ती पब्लिक स्कूलच्या इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी असून, या स्पर्धेत यश मिळवणारी जळगाव जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.

तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या निना कटलर, उपप्राचार्या श्रद्धाली घुले, मनप्रीत कौर तसेच सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.


राज्यात प्रथम आल्यामुळे दक्षायणीची आता ग्रेट एक्झामसाठी निवड झाली असून, तिला इस्त्रो (ISRO) च्या तिरुवनंतपुरम येथील दौऱ्यावर नेण्यात येणार आहे.

यावेळी तिला १२ हजार रुपये रोख, ट्रॉफी, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या यशासाठी दक्षायणीला शाळेतील शिक्षकांचे तसेच तिचे वडील सुबोध सपकाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

भुसावळ: जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, परिसर भक्तिमय

भुसावळ: जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, परिसर भक्तिमय

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading