Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / म्युनिसिपल हायस्कूल येथे संत गुरु रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती उत्साहात साजरी

म्युनिसिपल हायस्कूल येथे संत गुरु रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती उत्साहात साजरी

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

भुसावळ नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल येथे संत गुरु रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. मेढे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी राजू समशेर उपस्थित होते. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका एस. एन. बनसोडे यांच्या हस्ते संत गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर माजी विद्यार्थी राजू समशेर तसेच मुख्याध्यापक सुभाष मेढे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


यावेळी राजू समशेर यांनी संत रविदास महाराज यांच्या दोह्यांच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक व आध्यात्मिक कार्यावर प्रकाश टाकला. तसेच एस. टी. चौधरी यांनी आपल्या मनोगतात संत रविदास महाराज यांच्या विचारांचे महत्व विशद केले.


अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक एस. जी. मेढे यांनी संत रविदास महाराज यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करावा, असे आवाहन केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन एन. एच. राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

वर्दी फक्त पकडत नाही, जीवही वाचवते”; SDPO पाटील यांचा प्रेरणादायी संदेश

वर्दी फक्त पकडत नाही, जीवही वाचवते”; SDPO पाटील यांचा प्रेरणादायी संदेश

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading