भुसावळ खबर | ब्युरो रिपोर्ट आकाश ढाके | खबर 24 एक्सप्रेस

दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील परिपत्रक क्रमांक दिव्यांग-2024/प्र.क्र.86/दि.क्र.2, दिनांक 27 जून 2024 नुसार विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र (UDID Card) अनिवार्य करण्यात आले आहे.
मीज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे अद्याप UDID कार्ड उपलब्ध नाही, त्यांनी त्वरित UDID कार्ड प्राप्त करून घ्यावे. तसेच ज्या लाभार्थ्यांच्या UDID कार्डची मुदत संपलेली आहे, त्यांनी सेतु सुविधा केंद्रामार्फत नवीन UDID कार्डसाठी अर्ज करावा, असे आवाहन तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
सर्व संबंधित लाभार्थ्यांनी एका महिन्याच्या आत आपले UDID कार्ड तहसील कार्यालय, भुसावळ येथे किंवा आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7