Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भवानी पेठ सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भव्य दिव्य श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

भवानी पेठ सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भव्य दिव्य श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

भूसावाल न्यूज | ब्यूरो रिपोर्ट आकाश ढाके | खबर 24 एक्सप्रेस


भुसावळ शहरातील गंगाराम प्लॉट येथील भवानी पेठ सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भव्य दिव्य संगीतामय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ, सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सप्ताहास दि. 26 जानेवारी 2026 (सोमवार) रोजी प्रारंभ होणार असून दि. 2 फेब्रुवारी 2026 (सोमवार) रोजी समारोप होणार आहे.

या सप्ताहात दररोज पहाटे काकड आरती (५ ते ६), सकाळी विष्णुसहस्रनाम (७ ते ८), दुपारी भागवत कथा (१२ ते ४), सायंकाळी हरिपाठ (५ ते ७) व रात्री हरी कीर्तन (८ ते १०) असा भक्तिमय कार्यक्रम रंगणार आहे. सप्ताहाच्या कालावधीत विविध मान्यवर कीर्तनकार व प्रवचकांचे प्रवचन व कीर्तन होणार असून परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.


कार्यक्रमात भारुड, महाराष्ट्रात (विशेष कार्यक्रम), टिंभी सोहळा यांसह दि. 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 8 ते 10 या वेळेत काल्याचे कीर्तन होणार आहे. या संपूर्ण सप्ताहात मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


हा धार्मिक सोहळा भवानी पेठ सांस्कृतिक मंडळ, गंगाराम प्लॉट, भुसावळ येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

“कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी”

"कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी"

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading