मुक्ताईनगर न्यूज | ब्यूरो रिपोर्ट आकाश ढाके | खबर 24 एक्सप्रेस

मुक्ताईनगर : रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली व बेलखेड परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथे उत्साहात पार पडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारकडून सुरू असलेल्या विकासकामांवर विश्वास व्यक्त करत या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत पक्ष संघटना अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
भाजपात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये डी. आर. नाना महाजन, विजय सावकारे, दिपक बेलदार, स्वप्निल कोळी, विजय बारी, योगेश झिरी, आकाश चिंचोलकर, दिपक सुरवाडे, अजय बेलदार, राहुल भिलाला, निलेश देशमुख, शुभम पुनासे, धनराज कापसे, गौरव झिरी, हर्षल बेलदार, राहुल बावस्कर, किरण बारी, आकाश शिंदे, गोविंदा ऊबाळे, विजय कापसे, प्रमोद मोरे, पावन जाधव, सुनील सोनवने, ईश्वर शेलार, श्याम कोळी, बबलू भिलाला, लोकेश देशमुख, पवन झिरी, स्वप्निल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, चेतन पाटील, साहेबराव पाटील आदींचा समावेश आहे.
या पक्षप्रवेशामुळे मुक्ताईनगर तालुक्यात भाजपाची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र असून आगामी काळात पक्षकार्य अधिक प्रभावीपणे राबवले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
ब्यूरो रिपोर्ट आकाश ढाके, मुक्ताईनगर
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7