Pune News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते फ्लॅग-ऑफ
बालेवाडी (पुणे) : भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेली UCI मान्यताप्राप्त (2.2 श्रेणीतील) आंतरराष्ट्रीय बहु-टप्पा सायकल स्पर्धा ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ सध्या पुणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात सुरू आहे. या जागतिक दर्जाच्या स्पर्धेच्या पुणे–हवेली–पिंपरी चिंचवड (पीसीएमसी) या चौथ्या टप्प्याचा भव्य शुभारंभ आज बालेवाडी येथे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार आणि केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री मा. श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते करण्यात आला.
‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ ही स्पर्धा १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत होत असून, पुणे, पिंपरी-चिंचवड, मुळशी, मावळ, पुरंदर आणि बारामती या भागांमधून मार्गक्रमण करत आहे. या स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याची नैसर्गिक सुंदरता, सांस्कृतिक वारसा आणि क्रीडा पर्यटनाची क्षमता जागतिक पातळीवर अधोरेखित होत आहे.
या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर बजाज ऑटो असून, ही स्पर्धा भारतातील सायकलिंग क्रीडेला नवी दिशा देणारी ठरत आहे. तरुण पिढीला क्रीडाक्षेत्राकडे आकर्षित करणे, आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि भारताला जागतिक क्रीडा नकाशावर ठळकपणे मांडणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भारत क्रीडा पर्यटनाचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येत असल्याचे सांगत, अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे देशातील क्रीडा संस्कृती अधिक मजबूत होत असल्याचे मत व्यक्त केले.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, बालेवाडी (पुणे)
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7