Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / दुष्काळी अनुदान वाटपात घोटाळ्याचा आरोप; कार्यवाही न झाल्याने 26 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा

दुष्काळी अनुदान वाटपात घोटाळ्याचा आरोप; कार्यवाही न झाल्याने 26 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ : भुसावळ तालुक्यात सन 2022-23 मध्ये पडलेल्या दुष्काळासाठी शासनाकडून सन 2024-25 मध्ये वितरित करण्यात आलेल्या अनुदानाच्या वाटपात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी केला आहे.

या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात येऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने, सानप यांनी दि.26 जानेवारी 2026 पासून भुसावळ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

केदारनाथ सानप यांनी दि.4 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे यासंदर्भात लेखी तक्रार अर्ज सादर केला होता. या तक्रारीत तहसीलदार निता लबडे व संबंधित कर्मचाऱ्यांनी दुष्काळी अनुदान वाटप करताना आधारकार्ड, सातबारा उतारे तसेच पंचनामे बनावट पद्धतीने तयार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

शेती नसलेल्या व्यक्तींनाही त्यांच्या बँक खात्यांवर अनुदान वितरित करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा दावा सानप यांनी केला आहे.

या तक्रारीची दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी दि.5 जानेवारी 2026 रोजी उपविभागीय अधिकारी, भुसावळ विभाग यांना चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, चौकशीचे आदेश देऊनही आजतागायत कोणतीही प्रत्यक्ष चौकशी अथवा दोषींवर कार्यवाही झालेली नसल्याचे सानप यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, सानप यांनी दि.12 जानेवारी 2026 रोजी साकेगाव (ता. भुसावळ) येथील दुष्काळी पंचनामे, बाधित शेतकऱ्यांची यादी तसेच अनुदान वितरणाचा सविस्तर तपशील माहिती अधिकाराअंतर्गत मागितला होता.

मात्र, दि.23 जानेवारी 2026 रोजी आवश्यक माहिती न देता अर्ज निकाली काढण्यात आला. यावरून लाखो रुपयांच्या कथित अपहाराचा प्रकार लपवण्यासाठीच माहिती दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणात दोषींवर तातडीने चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावेत, अन्यथा दि.26 जानेवारी 2026 रोजी भुसावळ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना ई-मेलद्वारे तसेच उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे दिला आहे.


ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

“कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी”

"कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी"

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading