Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / राजकीय मतभेद बाजूला; भुसावळच्या पाणी प्रश्नावर सकारात्मक तोडगा

राजकीय मतभेद बाजूला; भुसावळच्या पाणी प्रश्नावर सकारात्मक तोडगा

Busawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

भुसावळ शहरातील पाणी प्रश्नावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमात सकारात्मक चित्र दिसून आले आहे. प्रा. उत्तम सुरवाडे यांनी केलेल्या “राजकारण बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्र काम करण्याच्या” आवाहनाला नगराध्यक्षा गायत्री भंगाळे तसेच भाजप गटनेते युवराज लोणारी यांनी दिलेल्या पाठबळामुळे पाणी प्रश्न सुटण्याचे संकेत मिळाले असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


एकीकडे पाणी प्रश्न राजकीय मुद्दा बनलेला असतानाच, दुसरीकडे प्रत्यक्ष पाणीपुरवठ्यात झालेला बदल भुसावळकरांसाठी सुखद ठरला आहे. पूर्वी दहा-बारा दिवसांनी मिळणारे पाणी आता चार-पाच दिवसांत मिळू लागल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि समाधान व्यक्त होत आहे.


काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात सत्ताधारी गटाचे समन्वयक प्रा. उत्तम सुरवाडे यांनी भुसावळच्या विकासासाठी सत्ताधारी व विरोधकांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन केले होते.

या भूमिकेला नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि भाजप गटनेते युवराज लोणारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर दोन्ही मान्यवरांनी सहकाऱ्यांसह शहरातील विविध समस्यांची प्रत्यक्ष पाहणी देखील केली.


माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक सक्षमपणे राबविल्याचे दिसून येत आहे.

यामुळे दहा-बारा दिवसांनी मिळणारे पाणी आता पाच-सहा दिवसांत मिळू लागले असून, येत्या काळात आणखी कमी कालावधीत नियमित पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू आहे. पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त नागरिकांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.


भुसावळकरांनी याआधी राजकीय वैमनस्याचे टोकाचे स्वरूप पाहिले असल्याने, पाण्यासारख्या अत्यावश्यक प्रश्नावर तरी राजकीय आरोप-प्रत्यारोप टाळून एकत्रितपणे समस्या सोडवावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

“आता विखार नको, विकास हवा” अशी भावना शहरात उमटू लागली असून, पाणी प्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने पडलेले हे पाऊल आश्वासक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहे.


दरम्यान, भाजपच्या काही नगरसेवकांनी केलेल्या आरोपांवर नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मी माझे उत्तर शब्दांत नव्हे तर कामातून देणार आहे. आधी करून दाखवते आणि मग सांगते.

कुणी सनदशीर मार्गाने विरोध करत असेल तर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, विकासकामांमध्ये कुणी अडथळा आणू नये,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आगामी काळात शहरवासियांना नियमित आणि शुद्ध पाणी मिळेल, तसेच अन्य नागरी समस्यांचेही निवारण केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- ‘बात बंद कर दी थी’, एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- 'बात बंद कर दी थी', एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading