Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / प्रभाग २० मधील विकासकामांचा दर्जा संशयास्पद, निकृष्ट कामांमळे नागरिकांचा संताप; बिल रोखण्याची मागणी

प्रभाग २० मधील विकासकामांचा दर्जा संशयास्पद, निकृष्ट कामांमळे नागरिकांचा संताप; बिल रोखण्याची मागणी

भुसावळ प्रतिनिधी / आकाश ढाके

भुसावळ येथील प्रभाग क्रमांक २० मध्ये करण्यात आलेल्या विविध विकासकामांच्या दर्जाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सदर प्रभागात झालेली रस्त्यांची कामे, गटारांची बांधकामे, विद्युत दिव्यांची उभारणी तसेच इतर काँक्रीटीकरणाची कामे ही संबंधित कंत्राटदारामार्फत निकृष्ट दर्जाची करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

या कामांमध्ये डुप्लिकेट व कमी प्रतीचे साहित्य वापरण्यात आले असून अनेक ठिकाणी निकृष्ट मटेरियलचा वापर स्पष्टपणे दिसून येतो. काही ठिकाणी रस्त्यांवर तडे, गटारांची उंच-खोल पातळी चुकीची असणे तसेच विद्युत खांब व दिव्यांची बसवणूक नियमानुसार नसल्याचेही निदर्शनास आले आहे.


महत्त्वाचे म्हणजे, ही सर्व कामे सार्वजनिक निधीतून अर्थात कररूपाने नागरिकांकडून वसूल करण्यात आलेल्या पैशांतून करण्यात आली आहेत. त्यामुळे जनतेच्या कष्टाच्या पैशाची उधळपट्टी होऊ नये, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


या पार्श्वभूमीवर प्रभागातील रहिवाशांनी सदर कामांची तातडीने स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली असून चौकशी पूर्ण होईपर्यंत व कामांचा दर्जा समाधानकारक असल्याची खात्री होईपर्यंत संबंधित कंत्राटदारांची कोणतीही बिले काढू नयेत अथवा अदा करू नयेत अशी ठाम भूमिका घेतली आहे.


या प्रकरणात संबंधित विभाग व भुसावळ नगरपालिकेचे अधिकारी काय भूमिका घेतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading