Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / पार्किंग रस्त्याचा मंजूर मार्ग गायब; संगनमताने दिलेल्या CC वर प्रश्नचिन्ह

पार्किंग रस्त्याचा मंजूर मार्ग गायब; संगनमताने दिलेल्या CC वर प्रश्नचिन्ह

भुसावल प्रतिनिधि | आकाश ढाके | खबर 24 एक्सप्रेस

भुसावळातील सर्वे क्र. 115/1/अ, प्लॉट क्र. 9 या स्थळावरील बांधकामामध्ये मंजूर नकाशापेक्षा तफावत असून, विशेषतः पार्किंगचा बाहेर निघण्याचा रस्ता मंजूर आराखड्यात असताना प्रत्यक्ष जागेवर ठेवलेला नाही. उपविभागीय कार्यालय भुसावळ व नगररचना विभाग, जळगाव यांनी Completion Certificate (CC) जारी केलेले असतानाही बांधकाम हे मंजूर नकाशाविरुद्ध करण्यात आले आहे. ही गंभीर नियमभंगाची व अनियमिततेची बाब असून, संबंधित अधिकारी व बिल्डिंग मालक यांनी संगनमताने हे बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठोस संशय आहे.

सदर बेकायदेशीर बांधकामामुळे परिसरात पार्किंग संदर्भात गंभीर अडचणी निर्माण झाल्या असून पत्र क्रमांक 142 च्या तरतुदींचे देखील उल्लंघन झाले आहे. या प्रकरणाविरोधात मी तक्रार दिल्यानंतर, बिल्डिंग मालक, त्याची दोन मुले तसेच त्यांचे ४ ते ५ साथीदार यांनी माझ्या घरासमोर येऊन गलिच्छ शिवीगाळ करून धमक्या दिल्या व मला जीव मारण्याची धमकी दिली आहे.

या प्रकरणी मी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात लेखी NC तक्रार दाखल केली आहे. तसेच मी स्पष्टपणे नोंदवू इच्छितो की

जर माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यास शारीरिक इजा, अपघात किंवा जीवितास धोका निर्माण झाला, तर त्यास संबंधित अधिकारी, बिल्डिंग मालक, त्याची मुले व त्यांचे साथीदार हेच जबाबदार असतील.

या अनियमिततेबाबत संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर तसेच बिल्डिंग मालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करण्याची नम्र परंतु ठाम मागणी आहे.

याशिवाय, चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्वे क्र. 115/1/अ, प्लॉट क्र. 9 या ठिकाणीस कोणत्याही प्रकारचा पुनर्विकास (revise plan), रिव्हिजन अथवा नकाशा मंजुरी प्रक्रिया राबवू नये, ही विनंती.

तसेच, जर माझ्या निवेदनावर तात्काळ योग्य कारवाई न झाल्यास, मी दि. २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे उपोषणास बसणार असल्याची नोंद घ्यावी.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

चमोली में निर्माणाधीन टनल में कुदरत का कहर! पानी और मलबे में फंसे मजदूर, NDRF का रेस्क्यू ऑपरेशन जारी

चमोली में निर्माणाधीन टनल में कुदरत का कहर! पानी और मलबे में फंसे मजदूर, NDRF का रेस्क्यू ऑपरेशन जारी

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading