
Akash Dhake | मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामार्फत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. हा कार्यक्रम मुक्ताईनगर येथील खासदार संपर्क कार्यालयात पार पडला.
जिल्हा निवडणूक प्रभारी मंत्री संजय सावकारे आणि आमदार श्री. अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुलाखती झाल्या.
नगराध्यक्ष पद हे महिला राखीव असल्याने या पदासाठी नजमा इरफान तडवी, भावना ललित महाजन, निता प्रविण पाचपांडे, तहजीब बी सना जहांगिर खान, गायत्री विनोद सोनवणे तसेच अन्य महिलांनी आपली इच्छा व्यक्त केली.
या वेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल जवरे, तालुकाध्यक्ष (उत्तर) मोहन महाजन, तालुकाध्यक्ष (दक्षिण) जयपाल बोदडे, तालुका सरचिटणीस पंकज कोळी, उमेश कोळी, अतुल महाजन, चंद्रकांत भोलाणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, मुक्ताईनगर
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7