
Report Akash Dhake | कामठी (जि. नागपूर) – नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य भाजप कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला महाराष्ट्राचे महसूल व पालकमंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवर्जून उपस्थिती लावली.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी पक्षाच्या धोरणांची माहिती दिली आणि संघटन बळकटीकरणावर भर दिला. या मेळाव्यादरम्यान प्रभाताई राऊत, पल्लवीताई डोंगरे, भारती मेश्राम, सुकेशिनी गजभिये यांच्या नेतृत्वाखाली अरुणाताई भटकर, राजश्रीताई रामटेके, रमाताई दहाट, संध्याताई मेश्राम, सविताताई श्रीरामे, ललिताताई नारनवरे, कविताताई बावणे यांच्यासह शेकडो महिलांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

या कार्यक्रमास माजी आमदार टेकचंद सावरकर, भाजप जिल्हा महामंत्री अनिल निधान, अजय बोढारे, राहुल किरपान, कोषाध्यक्ष अजय अग्रवाल, शहराध्यक्ष मंगेश यादव, महिला आघाडी अध्यक्षा नंदाताई बारई, अल्पसंख्यक अध्यक्ष बरकत अली, युवा मोर्चा अध्यक्ष अल्केश लांजेवार, महामंत्री नरेश पारवानी, नरेंद्र डोंगरे, नरेश कलसे, विवेक मंगतानी, संजय कनोजिया, डॉ. संदीप कश्यप, चंद्रशेखर तुप्पट, मनोज चवरे, कपिल गायधने, लालसिंग यादव, प्रतीक पडोले, उज्वल रायबोले, श्रावण केझरकर, राजेश देशमुख, रमेश वैद्य, कमलकिशोर यादव, ब्रम्हा काळे, दिलीप बांडेभुचे, राजेश खंडेलवाल, प्रेमेंद्र यादव, आशिष फुटाणे, लतेश्वरीताई काळे, प्रीतीताई कुल्लरकर, संगीताताई अग्रवाल, गायत्रीताई यादव, रोशनीताई कानफाडे, रेखाताई शर्मा, कल्पनाताई मुंडूराव, सुषमाताई शिलाम, चंदाताई तुरस्कर, प्रीतम यादव, वैशालीताई मानवटकर, देवानंद देशमुख, हेमू शर्मा, दिनेश शरण, रेखाताई झंझाड, कुंदाताई रोकडे, अनिल पिंगळे, शफीक शेख, यश कोंडे, प्रमोद कातोरे, शेखर इनवाते, समीर यादव, मनोहर बावनकुळे, शंकर चवरे, सुनील पाटील, सुनील खानवानी, पंकज वर्मा, विजय कोंडुलवार, मुस्लिम रजा जाफरी, बबलू रोचलानी, अशोक झाडे, विक्की बोरकर, आशु अवस्थी, अन्नू शर्मा, कुणाल सोलंकी, रजत यादव, कैलास मलिक, प्रमोद वर्णम, योगेश गायधने, पुष्पराज मेश्राम, रोहित तरारे, सानू ग्रावकर, सुनील शिलाम, अजीत सोनकुसरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या मेळाव्याद्वारे कामठी तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट दिसून आले. महिलांचा मोठ्या संख्येने झालेला पक्षप्रवेश हा भाजपच्या वाढत्या प्रभावाचा आणि जनाधाराचा प्रत्यय देणारा ठरला आहे.
ब्यूरो रिपोर्ट : आकाश ढाके, नागपुर
Tags:
Bharatiya Janata Party, BJP Maharashtra, Nagpur, Chandrashekhar Bawankule, BJP Women Wing, Kamthi, Devendra Fadnavis, Narendra Modi, J.P. Nadda
Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines Khabar 24 Express Indias Leading News Network, Hindi News – Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines, current affairs, cricket, sports, business and cinema, Latest Hindi News, Breaking News in Hindi, Bollywood Gossip, Bollywood News, Top Hindi News Channel, Khabar 24 Express Live TV, Khabar24, Khabar24 Express