Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या मतदार यादीवरील हरकतींसाठी मुदतवाढ

नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या मतदार यादीवरील हरकतींसाठी मुदतवाढ

राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवरील हरकती आणि सूचनांसाठी दिलेली मुदत वाढवली आहे. आता नागरिकांना आपली हरकत किंवा सूचना नोंदवण्यासाठी १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वेळ मिळणार आहे.

ही प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. याआधी हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख १३ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी आयोगाने मुदतवाढ जाहीर केली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार, सर्व हरकतींचे निपटारे झाल्यानंतर ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe