Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का, अनेक कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश

भुसावळमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का, अनेक कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश



भुसावळ शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मोठा धक्का बसला आहे. शहरातील प्रभावशाली नगरसेवक व माजी नगरसेवक शेख पापा शेख कालू, सामाजिक कार्यकर्ते फिरोज रहेमान शेख आणि बशीरदादा ठेकेदार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

या सर्वांनी पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार आणि माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आपला पायंडा स्पष्ट केला आहे.

संतोषभाऊ चौधरी यांच्या हस्ते नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी युवा नेते सचिन चौधरी, ओबीसी जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, तालुकाध्यक्ष विशाल नारखेडे, शहराध्यक्ष अशरफ खान, माजी नगरसेवक उल्हास पगारे, दुर्गेश ठाकूर, रेहान कुरेशी आणि रामदास सावकारे आदी मान्यवर उपस्थित होते.

भुसावळ शहरात शरदचंद्र पवार गटाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. संतोषभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वावर स्थानिक नागरिकांचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading