Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / शहरातील टीव्ही टॉवर मैदानावर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पारंपरिक रावण दहन सोहळा संपन्न

शहरातील टीव्ही टॉवर मैदानावर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पारंपरिक रावण दहन सोहळा संपन्न

आकाश ढाके, भुसावळ : शहरातील टीव्ही टॉवर मैदानावर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गुरुवारी पारंपरिक रावण दहन सोहळा उत्साहात पार पडला. या निमित्ताने रावण, मेघनाथ आणि कुंभकर्ण यांच्या भव्य प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या.

या कार्यक्रमात रावणाच्या पुतळ्याचे दहन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांच्या हस्ते, कुंभकर्णाच्या पुतळ्याचे दहन उद्योजक मनोज बियाणी यांच्या हस्ते तर मेघनाथाच्या पुतळ्याचे दहन माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्याला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. पारंपरिक पूजा-अर्चा करून दहनाची सुरुवात करण्यात आली. “जय श्रीराम”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले.

दसऱ्याच्या निमित्ताने वाईटावर चांगल्याचा विजय हा संदेश या रावण दहन सोहळ्यातून देण्यात आला.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe