Breaking News
BigRoz Big Roz
Home / Maharashtra / दुबार पेरणी आणि कर्जबाजारीपणामुळे शिवना येथे शेतकऱ्याची आत्महत्या

दुबार पेरणी आणि कर्जबाजारीपणामुळे शिवना येथे शेतकऱ्याची आत्महत्या

रिपोर्ट : मुजीब शेख, शिवना (ता. सिल्लोड), २८ जून :
पावसाच्या लहरीपणामुळे यंदाच्या खरीप हंगामात दोन वेळा पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आणि त्यातच ग्रामीण बँक व खाजगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेत सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील नारायण भिका नवरे (वय ५२) या शेतकऱ्याने अखेर आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.

शनिवार (२८ जून) रोजी सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास किन्ही शिवारात त्यांच्या शेतातील राहत्या घरात त्यांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली.

नारायण नवरे यांच्याकडे केवळ तीन एकर कोरडवाहू जमीन होती. ते आपल्या पत्नी आणि मुलासोबत शेतातच राहात होते. यंदा सततच्या पावसाच्या अनिश्चिततेमुळे त्यांना दोनदा पेरणी करावी लागली. त्यात उत्पादन खर्च वाढला, मात्र उत्पन्नाची कुठलीही खात्री नव्हती.

कर्जाचा बोजा, उत्पन्नाची चिंता आणि आर्थिक अस्थिरतेमुळे ते गेल्या काही दिवसांपासून तणावात होते, असे गावकऱ्यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच अजिंठ्याचे आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर गीते यांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली.

घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढाकने यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार धम्मदीप काकडे आणि बीट जमादार संदीप कोथळकर करत आहेत.

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe