Breaking News
BigRoz Big Roz
Home / Maharashtra / नामंजूर नोंदी मंजूर केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश

नामंजूर नोंदी मंजूर केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश

भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे प्र.न. मंडळ अधिकारी यांनी वराडसीम, साकेगाव व गाेंंभी शिवारातील गटांवरील नामंजूर नोंद मंजूर करून आपल्या पदाचा गैरवापर केला असा तक्रार अर्ज सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिला होता. या तक्रार अर्जाची दखल घेत चौकशी आदेश उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.


माहिती अशी की, तालुक्यातील कुर्‍हे प्र.न. येथील मंडळ अधिकारी प्रविण लक्ष्मण पाटील यांनी पदाचा गैरवापर करून वराडसीम गट नं. 382 नामंजूर नोंद 9562 व मंजूर नोंद 9567, साकेगाव शिवारातील गट क्र. 298/1/1/ब/2 वरील नोंद क्र.31359 अगोदर नामंजूर केली व त्याच गटातील 31492 नोंद मंजूर केली. तसेच गोंभी शिवारातील गट नं. 23 वरील नोंद नं. 1383 नामंजूर करून 1385 व 1407 या नोंद मंजूर केल्या असा तक्रारी अर्ज दि. 9 जून 2025 रोजी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिला होता. या अर्जाची दखल प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी भुसावळ यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल विभागाचे तहसीलदार विजय सुर्यवंशी यांनी दिले असून याबाबतचा अहवाल कार्यालयास सादर करावा असे आदेशात नमुद केले आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe