Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळहून पंढरपूरसाठी आषाढी एकादशी निमित्त मोफत विशेष रेल्वे

भुसावळहून पंढरपूरसाठी आषाढी एकादशी निमित्त मोफत विशेष रेल्वे

रावेर लोकसभा क्षेत्रासह जळगांव व बुलडाणा जिल्हा परीसरातील वारकरी व भाविकांसाठी रेल्वे तर्फे पंढरपूर वारीसाठी अनारक्षित “विशेष आषाढी” रेल्वे गाडी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने उपलब्ध करून देण्यात येत असते. तसेच सदर संपूर्ण गाडीच्या तिकिटांचा खर्च केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पदरुन करण्यात येत असतो. यावर्षी सुद्धा “आषाढी एकादशी” निमित्त सदर मोफत विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे.


सदर “आषाढी एकादशी” मोफत विशेष रेल्वे गाडीस दि.५ जुलै रोजी भुसावळ स्टेशन येथून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार असून दि.६ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहचणार आहे तर त्याच दिवशी रात्रीच्या सुमारस परतीसाठी निघणार असल्याबाबत मध्य रेल्वे मार्फत कळविण्यात आले आहे. लवकरच सदर विशेष रेल्वे गाडीचा टाईमटेबल व थांबे कळविण्यात येणार आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe