
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती समारोह कार्यक्रमा अंतर्गत भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर उत्तर- दक्षिण मंडळ तर्फे सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे यांच्या विशेष उपस्थितीत भुसावळ शहरातील डॉ. श्यामाप्रसाद उद्यानातील नर्मदेश्वर महादेव मंदिर व परिसराची साफसफाई करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सन्माननीय ना. संजय सावकारे व पदाधिकारी यांच्या हस्ते मंदिरात महाआरती करण्यात आली. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना वंदन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येळकोट येळकोट जय मल्हार या घोषणा दिल्या.
यावेळी भारतीय जनता पार्टी उत्तर विभाग मंडळ अध्यक्ष संदीप सुरवाडे तसेच दक्षिण विभाग मंडळ अध्यक्ष किरण कोलते यांच्या यांच्यासह माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रमोद नेमाडे, राजेंद्र नाटकर, प्रदेश सचिव अजय भोळे, जिल्हा सरचिटणीस परीक्षित बऱ्हाटे, प्रवीण इखणकर, जिल्हा चिटणीस खुशाल जोशी, माजी नगरसेवक निर्मल कोठारी, पुरुषोत्तम नारखेडे, गिरीश महाजन, ललित मराठे, राजू खरारे, शंकर शेळके, रवींद्र ढगे, राहुल तायडे, प्रशांत पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष अनिता आंबेकर, अलका शेळके, शैलेजा पाटील, पल्लवी वारके, प्रमोद पाटील, अमोल पाटील, निलेश पाटील, अमित असोदेकर,अमोल झटकार, सागर चौधरी, सागर वाघोदे, रवींद्र खरात, रवींद्र दाभाडे, संतोष ठोकळ, गोपी राजपूत, करण पन्सारी आदींची उपस्थिती होती.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7