Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळ विभागात तिकीट तपासणीद्वारे विक्रमी ₹ १०.९२ कोटींचा महसूल

भुसावळ विभागात तिकीट तपासणीद्वारे विक्रमी ₹ १०.९२ कोटींचा महसूल

भुसावळ विभागाने एप्रिल २०२५ मध्ये तिकीट तपासणी क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विभागात विविध गाड्यांमध्ये सातत्यपूर्ण आणि व्यापक तिकीट तपासणी मोहिम राबवून बिनतिकीट प्रवास, अनियमित तिकिटे आणि प्रवास नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या. या मोहिमेमुळे केवळ महसूलात वाढ झाली नाही, तर प्रवाशांमध्ये प्रवास शिस्तीची भावना अधिक दृढ झाली आहे. प्रवाशांना अधिक सुसज्ज सेवा आणि आरामदायी प्रवास मिळावा यासाठी भुसावळ विभाग नियमितपणे मेल/एक्सप्रेस, हॉलिडे स्पेशल आणि पॅसेंजर गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहिमा राबवित आहे.
एप्रिल २०२५ मध्ये विभागाने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला असून तिकीट तपासणीद्वारे विनातिकीट/अनधिकृत प्रवासाच्या एकूण १ लाख २४ हजार प्रकरणांतून एकूण ₹१०.९२ कोटींचा महसूल मिळविला. ही रक्कम भुसावळ विभागाच्या इतिहासातील सर्वाधिक मासिक महसूल आहे. एप्रिल २०२५ साठी निर्धारित उद्दिष्टापेक्षा १८% अधिक महसूल प्राप्त करण्यात आला. या कामगिरीमुळे मे २०२२ मध्ये मिळविलेल्या ₹९.९७ कोटींच्या मागील विक्रमापेक्षा ₹९५ लाख अधिक महसूल मिळविण्यात विभाग यशस्वी ठरला. एप्रिल २०२५ मध्ये अनियमित प्रवासाची एकूण ५६,००० प्रकरणे नोंदवली आहेत त्यातून ₹३.४९ कोटीचा दंड वसूल, विनातिकीट प्रकरणांमधून एकूण ६८,००० प्रकरणे त्यातून ₹७.४२ कोटीचा दंड वसूल आणि सामानाच्या बुक न केलेल्या एकूण १६० प्रकरणांमधून ₹४४,००० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
भुसावळ विभाग सर्व प्रवाशांना विनंती करतो की त्यांनी प्रवासासाठी योग्य आणि वैध तिकिटांसहच प्रवास करावा, जेणेकरून कोणत्याही अडचणीशिवाय सन्माननीय आणि सुलभ प्रवासाचा अनुभव घेता येईल.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ

See This Also 👇


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

Chandrashekhar Bawankule News: “अधिकारियों की एक गलत साइन परिवार बर्बाद कर सकती है”, राजस्व मंत्री बावनकुले की सख्त चेतावनी

Chandrashekhar Bawankule News: “अधिकारियों की एक गलत साइन परिवार बर्बाद कर सकती है”, राजस्व मंत्री बावनकुले की सख्त चेतावनी

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading