Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळ – खंडवा दरम्यान OMS विशेष तपासणी गाडीचे यशस्वी संचालन

भुसावळ – खंडवा दरम्यान OMS विशेष तपासणी गाडीचे यशस्वी संचालन

रेल्वे सुरक्षेला बळकटी देण्याच्या आणि पायाभूत सुविधांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने २४ एप्रिल २०२५ रोजी भुसावळ ते खंडवा या प्रमुख मार्गावर ऑस्सिलेशन मॉनिटरिंग सिस्टम (OMS) विशेष तपासणी गाडीचे यशस्वीपणे संचालन केले. ही विशेष तपासणी गाडी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून, ट्रॅकच्या भूमितीवर सतत नजर ठेवण्यास सक्षम आहे. प्रत्यक्ष वेळेत ट्रॅकमधील कोणतीही अयोग्यता अथवा बिघाड तत्काळ ओळखण्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरते.
या प्रणालीद्वारे ट्रॅकवरील कंपन, संरेखन (alignment), गेज, लेव्हल, राइड क्वालिटी निर्देशांक , वेग व गती वाढीचे नमुने तसेच ट्रॅक व फिटींग्जची संरचनात्मक स्थिती यांचा बारकाईने अभ्यास केला जातो.
या तपासणी गाडीमध्ये अत्यंत सुस्पष्टता असलेले सेन्सर्स व ऑनबोर्ड संगणकीय टॅब प्रणाली बसवण्यात आलेल्या आहेत. यामध्ये “अ‍ॅक्सिलरोमीटर” हे महत्त्वाचे डिव्हाईस लावण्यात आले असून, ते विविध भौतिक घटकांचे मोजमाप करून संबंधित माहिती प्रणालीला पाठवतात. हे डिव्हाईसेस ट्रॅकच्या देखभालीतील अचूकता व कार्यक्षमतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
अ‍ॅक्सिलरोमीटर डिव्हाईस ची प्रमुख कार्ये: वेग मोजणे ,गती व त्वरणाचे निरीक्षण आणि ट्रॅक भूमितीचे परीक्षण. अ‍ॅक्सिलरोमीटर डिव्हाईस जीपीएस (GPS) आधारित असून, गोळा केलेला डेटा थेट संबंधित रेल पथ निरीक्षकांना संदेशाद्वारे उपलब्ध करून दिला जातो. परिणामी, रेल्वे व्यवस्थापनाला वेळीच देखभाल व दुरुस्ती कार्यवाही करण्याची संधी मिळते. या त्रुटी वेळेत दुरुस्त करून भारतीय रेल्वे अपघातांची शक्यता कमी करण्यास, प्रवासात अडथळे कमी करण्यास, आणि प्रवाशांसाठी व मालवाहतुकीसाठी प्रवास अधिक सुरक्षित व आरामदायक करण्यास कटिबद्ध आहे.
ही विशेष तपासणी दरमहा एकदा विभागातील विविध मार्गांवर नियमानुसार केली जाते. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने रेल्वे सेवेची गुणवत्ता, सुरक्षितता आणि प्रवाशांचा विश्वास वाढवण्यासाठी उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading