Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / ऑनलाइन फेस रीडिंग हजेरी स्थगितीबाबत आ. एकनाथराव खडसे यांच्याशी भेट

ऑनलाइन फेस रीडिंग हजेरी स्थगितीबाबत आ. एकनाथराव खडसे यांच्याशी भेट

आज महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी संघटना ११७३-०४ आणि महाराष्ट्र राज्य कस्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, आरोग्य कर्मचारी संघटना यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, जळगांव, जामनेर, यावल, रावेर, चोपडा, धरणगाव, पारोळा, पाचोरा, एरंडोल, अमळनेर, चाळीसगाव तालुक्यांतील आरोग्य कर्मचाऱ्यांसह माजी मंत्री आणि विद्यमान आ. एकनाथराव खडसे यांची भेट घेतली. या भेटीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन फेस रीडिंग हजेरी आणि वेतन त्रुटींमुळे होणाऱ्या अडचणींबाबत निवेदन सादर करून सविस्तर चर्चा केली. चर्चा करताना त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अनेक समस्यांचे विवेचन केले, जेणेकरून अधिकाऱ्यांना त्यांच्या अडचणींची योग्य समज येऊ शकेल.
आ. एकनाथराव खडसे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा गांभीर्याने विचार करत तात्काळ राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त आणि अभियान संचालक अमगोथू श्रीरंगा नायक यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी आपल्याला पत्रके पाठवून माहिती दिली की ऑनलाइन फेस रीडिंग हजेरीमुळे कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणींची सविस्तर माहिती दिल्यानंतर आयुक्त नायक यांनी ही हजेरी प्रणाली स्थगित करण्याचे आश्वासन दिले. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विषयावर लक्ष देण्याची गरज अधोरेखित करत, शुश्रुषा कर्मचाऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या भावना व अडचणी समजून घेतल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. तसेच या प्रणालीमुळे कोणत्याही कर्मचाऱ्याच्या वेतनावर परिणाम होणार नाही किंवा पगार थांबणार नाही असेही स्पष्ट केले, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रगाढ आशा निर्माण झाली. यामुळे राज्यातील सर्व आरोग्य कर्मचारी संघटनांनी लोकनेते आ. एकनाथराव खडसे आणि मा.आयुक्त नायक साहेब यांचे आभार मानले आहेत, कारण त्यांच्या सहकार्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यात मदत मिळेल, असा विश्वास सर्वत्र व्यक्त केला जात आहे.

Watch this also

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, मुक्ताईनगर


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- ‘बात बंद कर दी थी’, एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- 'बात बंद कर दी थी', एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading