
श्री गणेश कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर ला नायब तहसीलदार शोभा घुले आणि हेमंत गुरव सोबत इतर सहकारी यांनी विशेष भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयक माहिती घेतली आणि या तंत्रज्ञानाच्या भविष्यातील उपयोगांवर चर्चा केली. प्रशासनातील डिजिटल परिवर्तन आणि एआय चा वापर कसा करता येईल यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. सेंटरच्या प्रशिक्षकांनी AI तंत्रज्ञानाची कार्यपद्धती व त्यांचे फायदे आणि विविध क्षेत्रांमध्ये होणारा प्रभाव याबाबत सखोल माहिती दिली.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ