भुसावळात अखिल स्तरीय महा-ई सेवा केंद्र व आधार केंद्र संघटनेच्या वतीने दि. ९ जानेवारी २०२५ गुरुवार रोजी विविध मागण्यांसाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. संघटनेचे जिल्हा सचिव राकेश चव्हाण आणि तालुका अध्यक्ष वैशाली सरदार यांच्या नेतृत्वाखालील हे निवेदन सादर करण्यात आले.
संघटनेच्या प्रमुख मागण्या तसेच महा-ई सेवा केंद्र आणि आधार केंद्र चालकांच्या समस्या निवेदनामध्ये मांडण्यात आल्या. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह भुसावळ शहर व तालुक्यातील केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुका उपाध्यक्ष अमोल राऊत, सचिव निलेश कोलते, सहसचिव निलेश पाटील, कोषाध्यक्ष अनिश देशमुख आणि सल्लागार अॅड. सागर बहीरूने यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला.
भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या समोर निवेदन वाचून दाखविण्यात आले. निवेदनावर सविस्तर चर्चा झाली. निवेदनाची प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री तसेच संबंधित विभागांनाही देण्यात आल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन प्रांताधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी कार्यक्रमास अमिन पटेल, समीर मन्सूरी, आकाश ढाके, अमोल माळी, आकाश कोळी, वाजिद खान, संतोष कोळी, चंदन तायडे, फरजाना बेगम, निळकंठ गव्हाले, इमल्यास कासम, गुलाब पवार, रईस अहमद, प्रथमेश जोशी, राहुल सपकाळे, विकास चौधरी, अकीब बनीवाले, हरीश बोरसे, दीपक फेगडे, राहुल बरडे, शेख वसीम यांच्यासह अनेक केंद्र चालक उपस्थित होते.
संघटनेचा पुढील कृती कार्यक्रम संघटनेने मागण्या मान्य होईपर्यंत आपल्या लढ्याची भूमिका ठाम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच मागण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ