भुसावळ पंचायत समिती येथील शिक्षण विभाग येथे दहा वर्षापासून सहाय्यक पदावर कार्यरत असलेले भास्कर रामदास चिमणकर यांची कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदी पदोन्नती झाली. त्यांनी पंचायत समिती यावल येथे दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदाचा परभार स्विकारला. त्या बद्दल महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्या तर्फे त्यांचे अभिनंदन करून त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शा.पो.आ. अधीक्षक अजित तडवी, महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे यांच्यासह बी.आर.सी. तील सर्व तज्ञ शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी गुणगान गायले. व यापुढे सुद्धा भुसावळ पंचायत समिती शिक्षण विभागास आपली मदत लागल्यास आपण ती करावी असे आव्हान करण्यात आले.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ