Breaking News
BigRoz Big Roz
Home / खबरें / भुसावळातील लाहोटी परिवाराने केली करवा चौथ साजरी

भुसावळातील लाहोटी परिवाराने केली करवा चौथ साजरी

करवा चौथ व्रत विवाहित स्त्रिया आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी करतात. यावेळी करवा चौथला अतिशय शुभ संयोग घडत आहेत. आश्विन संकष्टी चतुर्थी या दिवशी येते. या व्रतामध्ये भगवान शिव, माता पार्वती आणि चंद्राची पूजा केली जाते. यावेळी करवा चौथवर अनेक शुभ योगही तयार होत आहेत.

करवा म्हणजे मातीचा घट आणि चौथ म्हणजे चतुर्थी. करवा चौथ व्रत करताना सुवासिनी सर्व प्रकारचे सौभाग्यलंकार परिधान करतात. या दिवशी नवीन करवा आणून तो सजवला जातो. यानंतर पूजा करून याच करवातून चंद्राला अर्घ्य दिले जाते. या दिवशी पहाटे लवकर उठून महिला व्रताचा संकल्प करतात. संपूर्ण दिवसभर निर्जला व्रत करून रात्री चंद्रदर्शन घेऊन त्याला अर्घ्य देतात आणि त्यानंतरच यजमानांच्या हातून पाणी ग्रहण करून व्रताची सांगता केली जाते. या व्रताचरणात सकाळी महादेव शिवशंकर, पार्वती देवी, गणपती आणि कार्तिकेय यांचे पूजन केले जाते. तर सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यावर चंद्रदेवतेचे पूजन करून त्यांना अर्घ्य दिले जाते.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- ‘बात बंद कर दी थी’, एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- 'बात बंद कर दी थी', एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading