जळगाव ते भुसावळ राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. भुसावळ तालुक्यातील साकेगाव जवळील वाघुर नदीच्या पुलावर बसने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेल्या महिला या गंभीररित्या जखमी झाल्याची घटना रविवारी ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. यात दुचाकी बसच्या मागच्या चाकात आल्याने चुराडा झाला आहे.
जखमी झालेल्या महिलेला तातडीने नजीकच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान या अपघात झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकीचा खोळंबा झाला होता. यावेळी भुसावळ तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करण्याचे काम सुरू होते. मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव समोर आलेले नाही. पुढील चौकशीचे काम पोलीस कर्मचारी करीत आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ