Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / श्री. राधाकृष्ण प्रभात फेरी परिवार व हरित शहर स्वच्छ शहर भुसावळ शहर च्या वतीने हीरा मारोती येथे वृक्षारोपण…

श्री. राधाकृष्ण प्रभात फेरी परिवार व हरित शहर स्वच्छ शहर भुसावळ शहर च्या वतीने हीरा मारोती येथे वृक्षारोपण…

भुसावळ येथील श्री. राधाकृष्ण प्रभात फेरी परिवार व हरित शहर स्वच्छ शहर च्या वतीने भुसावळ जवळील दीपनगरच्या पुढे असलेल्या हिरामोती मंदिराच्या परिसरात वड, पिंपळ व औदुंबर या तीन वृक्षाचे एकत्रित पुजन मंदिराचे पुजारी गोरखनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रभात फेरीचे प्रमुख व व्यापारी संघाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, संजय अग्रवाल, हरित शहर स्वच्छ शहर संकल्पना राबविणारे नाना पाटील यांच्या हस्ते वृक्ष लावण्यात आले.

त्यानंतर भारतीय झाडे निंब, वड, पिंपळ, औदुंबर असे ८ ते १२ फूट उंच असलेले २१ वृक्ष मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आले. संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी मंदिराचे पुजारी व सेवेकरी यांनी घेतली. त्या ठिकाणी सुरुवातीला हनुमान चालीसा म्हणण्यात आली. त्यानंतर वृक्ष पूजनाच्या वेळी वृक्ष प्रार्थना करण्यात आली. वृक्षारोपण कार्यकमाचे नियोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने झाल्याने कमी वेळात 21 झाडे लावण्यात आली. नाना पाटील यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केल्याने ग्रुप च्या वतीने आभार मानले.

या कार्यक्रमाला राधेश्याम लाहोटी, संजय अग्रवाल, लीलाधर अग्रवाल, नाना पाटील, संजय फालक, महेश भालेराव, जगदीश शर्मा, श्याम अग्रवाल, सत्यनारायण शर्मा, विनोद राठोड, गोपाल जागिड, मदन बोरकर, दिलीप ओक, अनिल अग्रवाल, महेश पाटील, गोपाल तिवारी, रामदास कपले, गोपाळ पल्लेवाड, शुभम कपले, विलास पवार, नरेंद्र लड्डा, संजय मंत्री, दिलीप टाक, अनुप अग्रवाल, अशोक फालक, सुनील लाहोटी, जगदीश अग्रवाल, सुरेंद्रसिग पाटील, रामकृष्ण पाटील, विठ्ठल तुळसकर, दिलीप टाक, फुलचंद अग्रवाल, निलेश शर्मा, जीआर ठाकूर, लालजी पटेल, डॉ. देवेंद्र शर्मा, विना लाहोटी, डॉ. शुभांगी राठी, मीना अग्रवाल, नेहा मंत्री, संजू अग्रवाल, ज्योती आगीवाल, विनिता अग्रवाल, राजश्री देशमुख, श्रीमती. अॅडव्होकेट देशमुख, शशिकला लाहोटी, कल्याणी जोशी सह वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला हीरा मारोती येथे उपस्थित होते.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading