
भारतीय क्रीडा विकास महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा निलेश राणे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हजारो खेळाडूंनामार्गदर्शन करणारे महाराष्ट्राचे क्रीडासम्राट निलेश राणे यांच्या क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत संयुक्त राष्ट्र (आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभाग) आणि आयुष मंत्रालय (भारत सरकार) यांच्या मान्यतेने राणे यांना मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे.
येत्या सप्टेंबर 2023 मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या दीक्षांत समारंभात हा विशेष पदवीदान सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती देण्यात आली असून यात नाशिकच्या निलेश राणे यांना डॉक्टरेट पदवी देऊन गौरवण्यात येणार आहे, या विशेष कार्याबद्दल निलेश राणे यांच्यावर क्रीडा नव्हे तर शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, नासिक