जय श्री दादाजी फाउंडेशन व नरेंद्र मोदी विचार मंच (भारत) व जय हनुमान आयटीआय भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिलांकरिता रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध होणे करिता भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात हस्तकला विभाग भारत सरकार चे औरंगाबाद कार्यालयातील अधिकारी बोलविण्यात आले होते. त्यांच्याकडून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होणे करिता केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात जय श्री दादाजी फाउंडेशनचे अध्यक्ष व नरेंद्र मोदी विचार मंच चे राष्ट्रीय सचिव सौ योगिता मालवी, तसेच दादाजी फाउंडेशनचे सचिव श्री. उमेश मालवी, जय हनुमान आयटीआय भुसावळचे संचालक श्री. रंजन फालक, जय श्री दादाजी फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष इंगळे मॅडम, मुख्य समन्वयक चंद्रशेखर जोशी, अमळनेर तालुकाध्यक्ष अतुल पाटील, भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद जिल्हा सचिव चंद्रशेखर पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
*रिपोर्टर – आकाश ढाके, भुसावळ*