संघर्ष समिती बरोबर चर्चा विस्कटल्यामुळे संघर्ष समितीची बैठक तात्काळ त्याच ठिकाणी झाली व दिनांक 4 जानेवारीच्या 00.00 तासापासून 72 तासाच्या संपावर जाण्याचा निर्णय संघर्ष समितीमध्ये सहभागी सर्व संघटनांनी एकमताने घेतला.
यासंपामध्ये कर्मचारी, अभिंयते, अधिकारी व कंत्राटी कामगार व सुरक्षा रक्षक यांनी 100% मुख्यकार्यालय पासून ते शाखा कार्यालय, निर्मिती केंद्र, उपकेंद्रामध्ये काम करणारे सहभागी राहणार असल्याने संप होणार आहे.
महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समिती व 30 संघटना यांनी पुकारलेल्या दिनांक 4 जानेवारी ते 6 जानेवारी 2023 या 3 दिवसीय संपाबाबत मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व मा. ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य यांना अग्रेषित केलेल्या महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती खाजगीकरण धोरण व इतर मुद्दे या विरोधात क्रमबद्ध आंदोलनाबाबत दिलेल्या पत्रानुसार तसेच महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समितीच्या केंद्रीय पदाधिकार्यांच्या आदेशानुसार भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दिपनगर येथील संघर्ष समितीतील सहभागी 30 संघटना दिनांक 4 ते 6 जानेवारी 2023 रोजी 3 दिवसांच्या संपात सहभागी होत आहेत. तरी 4 जानेवारी रोजी 72 तासांच्या संप काळापासून सुरू होत असलेल्या संपामध्ये सहभागी होण्यासाठी ‘क’ पातळीतील कर्मचारी, अधिकारी, अभियंता यांना उपरोक्त पर्यायी व्यवस्था करून कार्यमुक्त करून सहकार्य करण्याची मागणी मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आंदोलन दरम्यान आंदोलन कर्ते शांतता मार्गाने संप करणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घेणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
संपकाळामध्ये दिपनगर वसाहत, फेकरी व निंभोरा बु या गावांना होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो, त्याची खबरदारी घेऊन नागरिकांनी पुढील 3 दिवस पाण्याचे, मोबाईल चार्ज व इतर इलेक्ट्रॉनिक संबंधित कामाचे नियोजन करून वापरावे तसेच पाणीपुरवठा हा वसाहत व गावांना टप्प्याटप्प्याने करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.
रिपोर्टर – आकाश ढाके, भुसावळ