दि. 25/12/2022 रोजी मोरया मंगल कार्यालय, शिरपूर कान्हाळा रोड, भुसावळ येथे राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य आदिवासी ठाकूर समाजाचे अध्यक्ष आदणीय डॉ. जितेंद्र युवराज ठाकूर हे होते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भुसावळचे आमदार संजय भाऊ सावकारे , माजी आमदार आदरणीय संतोष भाऊ छबिलदास चौधरी , माजी नगराध्यक्ष आदरणीय अनिलभाऊ चौधरी तसेच जळगांव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे व्हाइस चेअरमन आदरणीय विरेंद्रजी भोईटे साहेब, महाराष्ट्र राज्याचे सचिव आदरणीय रणजित भास्कर शिंदे सर, तसेच महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष श्री. चंद्रकांत सैदाने, सौ. शितल ताई जितेंद्र ठाकूर आदरणीय श्री. प्रताप सुर्यवंशी सर, तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष आदरणीय गोपाळ ठाकूर , भुसावळ तालुका अध्यक्ष श्री. हिंमत ओंकार ठाकूर, भुसावळचे तरुण युवा नगरसेवक श्री. दुर्गेश ठाकूर तसेच युवा अध्यक्ष श्री. प्रशांत गोरख ठाकूर होते.
तसेच सूत्र संचालन श्री. रमाकांत सुधाकर ठाकूर, श्री. किरण बाबुराव ठाकूर, श्री. सुनिल ठाकूर व सौ.अपेक्षा ताई पवार यांनी सूत्र संचालन केले. या कार्यक्रमासाठी श्री. दत्तू मधुकर ठाकूर, प्रशांत प्रकाश ठाकूर, अविनाश पंडित ठाकूर, संजय प्रभाकर ठाकूरसमाधान लक्ष्मण ठाकूर,जयेश ठाकूर,गोलू अशोक ठाकूर, नारायण गोविंदा ठाकूर, संजय नामदेव ठाकूर, राजकुमार ठाकूर, अविनाश ठाकूर, प्रदीप अनिल ठाकूर, दिलीप वणा महाले, मुकेश सुरेश ठाकूर, राजू उत्तम ठाकूर, आदित्य मिलिंद सोनवणे यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम केले तसेच भुसावळ तालुक्यातील सर्व ठाकूर समाज बांधवांनी सहकार्य केले. या वर-वधू परिचय मेळाव्याला एकूण मुले 141 व मुली 72 यांनी नाव नोंदणी झाली.