दिल्ली येथील महाराष्ट्र सदन मधील प्रेस कॉन्फरन्स सभागृहात झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 11 ऑक्टोंबर लंडन येथे एम.एस.सी वर्गाचा पहिला दिवस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी हे औचित्य साधून भारतातील सामाजिक एकता या विषयावर कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये आंबेडकर चळवळीचे काशीराम, डॉ. एस. एम. पठाण, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, अडओकॅटे राज साहेब पाटील नवी दिल्ली, माजी. प्राचार्य माधव जोशी बारामती, ग्यानचंद गौतम नवी दिल्ली, डॉ. दीपक देशपांडे मेडिकल कॉलेजचे डिन देहरादून, अजमुद्दिन आसाम, सुरेश सिंग दार्जिलिंग, सुरज कुमार सिंग चंदीगड, डॉ. पूनम आदासी हिमाचल प्रदेश, डॉ. चंद्रा उप कुलगुरू बास्टर विद्यापीठ छत्तीसगड, अमृता सिंग डायरेक्टर सेंटर फॉरला, आय.आर.एस कमिशनर राजेश डावरे, त्याचप्रमाणे अल्पसंख्यांक आयोगाच्या संचालिका श्रीमती रिंचेन ल्हामा व केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश होता.
या मध्ये भुसावळचे व पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे नाना पाटील सर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामगीते विषयी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समानतेसाठी केलेले प्रयत्न पर्यावरण विषयक असल्याचे धोरण या विषयावर आपले विचार मांडले जनसेवा हीच ईश्वर सेवा मानू या समाजाला वेगळेपणाची जाणीव होऊ देऊ नका, समानतेने वागणूक द्या, असा विचार त्यांनी याप्रसंगी सांगितला, या कॉन्फरन्सला भुसावळ चे सुरेंद्र सिंग पाटील हेही उपस्थित होते. कॉन्फरन्स यशस्वी होण्यासाठी विविध संस्थांचे सहकार्य लाभळे।
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ