भुसावळ शहरात दिवसा सर्रासपणे वृक्षांची कत्तल केली जात आहे. तरी देखील पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे निसर्गप्रेमी मध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. वृक्षांची कत्तल करणाऱ्यांवर पालिका प्रशासनाकडून कारवाई होईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. भुसावळ शहरातील शांती नगरातील विपश्यता केंद्राजवळ बुधवारी दरेदार असलेल्या वृक्षाची कत्तल करण्यात आली आहे. या वृक्षतोडीमुळे निसर्गप्रेमी मध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरे असे म्हणून दरवर्षी विविध सामाजिक संस्थांकडून वृक्षारोपणाचे फोटो सेशन करितां मोठ-मोठे कार्यक्रम राबविले जात असतात. तर दुसरीकडे अशा जिवंत वृक्षांची कत्तल केली जात असताना कोणतीही सामाजिक संघटनानी त्यावर आवाज उचलला असल्याचे अजून तरी दिसून आले नाही. भुसावळ नगरपालिकेच्या नाकावर टिच्चून वृक्षतोड केली जात आहे, तरी देखील पालिका प्रशासनाकडून या वृक्षतोड करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई अद्याप पर्यंत झालेली नाही. त्यामुळे वृक्ष तोड करणाऱ्यांना फावले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ