भुसावळ शहरातील जामनेर रोडवर असलेल्या आण्णाभाऊ साठे नगरात लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माजी नगरसेवक संतोष बारसे व गब्बर चावरीया यांच्या हस्ते लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
कोरोनामुळे मागच्या दोन वर्षात मिरवणूक काढण्यात आली नाही. यंदा मात्र मोठ्या उत्साहात सर्व समाज बांधव मिळुन आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करीत असल्याचे माजी नगरसेवक संतोष बारसे यांनी म्हटले आहे.
या मिरवणुकीत नाचऱ्या अश्वाने सर्वाचे लक्ष वेधुन घेतले होते. माजी नगरसेवक संतोष बारसे यांनी आपल्या सहकाऱ्यासह डि.जे.च्या वाद्यावर चांगलाच ताल धरला होता. महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले. कार्यक्रमासाठी जयंती अध्यक्ष मनोज लोखंडे, वार्ड-अध्यक्ष अजय लोखंडे , हेमंत कांबळे, गणेश सपकाळे, मुकेश कांबळे, प्रशांत कांबळे, निलेश लोखंडे, यांनी मेहनत घेतली .
ब्यूरो रिपोर्ट- आकाश ढाके, भुसावळ