Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / महाआघाडीचा सुपडासाफ महायुतीच करणार-पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाआघाडीचा सुपडासाफ महायुतीच करणार-पंतप्रधान नरेंद्र मोदी

अनमोल पटले गोंदिया,दि.०३ – विरोधकांनी तयार केलेल्या महाआघाडीच्या महामिलावटला आमची महायुती सुपडासाफ करेल असा विश्वास व्यक्त करीत काँग्रेसने जाहिर केलेल्या जाहिरनाम्यातील देशद्रोहाचा गुन्हा हटविण्यावर टिका केली.सोबतच राष्ट्रीय सुरक्षेशी काँगेसने खेळण्याच्या केलेल्या प्रयत्नाबद्दल सरंक्षणमंत्री राहिलेले शरद पवार गप्प का असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(दि.३) केला.तसेच पवारांंना काँग्रेसचा जाहिरनामा मंजूर आहे का सांगावे लागेल असे म्हणत आत मी येथे फक्त केलेल्या कामाचा तपशील देण्यासाठी आलो आहे असे म्हणाले.भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी गोंदियात आले होते.


पंतप्रधानांनी वर्धा येथे महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा घेतली. या सभेला अपेक्षित गर्दी झाली नव्हती मात्र गोंदियातील सभेत भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आपल्या ३२ मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी काँग्रेसच्या घोषणापत्राचा तब्बल दहा मिनिटे खरपूस समाचार घेतला. देशाचे तत्कालीन संरक्षण मंत्री असलेले राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी प्रामाणिकपणे सांगावे की देशाशी विभागणी करण्याचा कट रचू पाहणा-या काँग्रेसचे त्यांना खरच समर्थन करावे काय याचे उत्तर त्यांनी जनतेल दिलेले बरे, देश विघात कृत्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू नये, अशी भूमिका घेणा-या पक्षाचे तुम्ही समर्थन करता का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केला.
यावेळी या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भंडा-यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले, शिवसेनेचे नेते डॉ. दीपक सावंत,आ.परिणय फुके,आ. विजय रहांगडाले, बाळा काशिवार, संजय पुराम , माजी खा.खुशाल बोपचे, प्रदीप पडोळे, उमेदवार सुनील मेंढे, माजी आ.केशव मानकर, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, विनोद अग्रवाल, माजी मंत्री गौरीशंकर बिसेन, माजी.खा.शिशुपाल पटले, खा.बोधसिंह भगत, शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले की,मी कुठून आलो,कुठ जन्म झाला हेच विरोधकांना पडले आहे.काँग्रेसच्या लोकाकंडून मला शौचालयाचा चौकिदार बोलले जात आहे.मला देश चालविता येत नाही अशी टिका केली जाते.काँग्रेसच्या काळात शेतकरी,सैनिक व युवक वर्ग चिंतेत होता,आता मात्र चिंतामुक्त झाला आहे.

………….

Report : Anmol Patle, Khabar 24 Express Bureau , Gondia

Please follow and like us:
189076

Check Also

#RaigarhBiaora का यह सिविल अस्पताल है या दलालों का अड्डा? देखिए कैसे खुद कर्मचारी खोल रहे हैं अस्पताल की पोल !!

आरोप प्रत्यारोप का दौर जारी सफाई कर्मी और स्टाफ नर्स के झगड़े ने खोली एक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy khabar 24 Express? Please spread the word :)