Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / गेल्या काही दशकात पोवारी बोली भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर, रिपोर्ट : विनीता ठाकरे

गेल्या काही दशकात पोवारी बोली भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर, रिपोर्ट : विनीता ठाकरे

गोंदिया,दि.०३ः-देशातील विविध प्रदेशात बोलीभाषांमधून सवांद साधून आपसातील व्यवहार केले जातात,प्रमाण भाषेपेक्षा बोलीभाषा ही सोपी असल्याने या बोलीभाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येक समाजाला झटणे गरजेचे आहे.पोवारी बोली भाषा ही देशातील महत्वाची भाषा असून राष्ट्रीय स्तरावर ४६ व्या क्रमांकावर या भाषेचे स्थान आहे.पोवारी बोलीभाषेमध्ये राजस्थानी,गुजराती,गोंडीसह जैन संस्कृती मिसळली गेली असून त्या भाषेने पोवारी बोलीभाषेतील काही शब्दांना आपल्या सामावून घेतले अशा पोवारी बोलीच्या संवर्धनासाठी मात्र समाज कुठे तरी मागे पडल्याने गेल्या एक दशकाचा विचार केल्यास पोवारी भाषेचा èहास झाल्याने ही भाषाच लुप्त होण्याच्या मार्गावर आली आहे.या पोवारी भाषेच्या संवर्धनासाठी समाजाच्यावतीने आयोजित केलेले हे पहिले साहित्य संस्कृती समेंलन मोलाचे ठरणार असून पोवारी बोलीभाषा ही बुंदेली भाषेची उपभाषा असल्याने या भाषेला अन्यन महत्व असल्याचे प्रतिपादन पोवारी बोलीभाषेच्या अभ्यासक प्रा.डॉ.मंजू अवस्थी यांनी केले.त्या राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभाप्रणित राष्ट्रीय पवारी साहित्य कला संस्कृती मंडळाच्यावतीने तिरोडा तालुक्यातील गुमाधावडा येथील गणेश हायस्कुलच्या प्रांगणात आयोजित पहिल्या अखिल भारतीय पोवारी भाषा साहित्य समेलनात समेलनाध्यक्ष म्हणून बोलत होत्या.


साहित्य समेलनाची सुरवात पुस्तक पोह्याने करण्यात आली.या समेलनाचे उदघाटन तिरोडा-गोरेगाव मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.स्वागताध्यक्ष म्हणून शिक्षण महर्षी राधेलाल पटले होते.समेलनाच्या विचारमंचावर जेष्ठ पवारी साहित्यिक जयपालqसह पटले,वरिष्ठ साहित्यकार व�� कार्यक्रमाचे उदघाटक आमदार विजय रहागंडाले म्हणाले की, साहित्य समाजाला जोडण्याचे काम करते.आपली भाषा आज लुप्त होत असेल तर ती कुठून तुटायला लागली याचाही विचार व्हायला हवे.आज आम्ही गावातून शहरात आलो की आपल्या बोलीभाषेला विसरुन प्रमाणभाषेच्या मागे धावत असल्यानेच आपली बोलीभाषा संपायला लागल्याची खंत व्यक्त करीत ग्रामीण भागातच पोवारी भाषेचे सवंर्धन होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.गावातील गोष्टी घडामोडींना लिखित स्वरुपात गोळा केले तर ते साहित्याच्या रुपात समोर येईल.सोबतच आपली बोलीभाषा बोलण्यासाठी स्वाभीमानाची गरज असल्याचे विचार व्यक्त केले.
गणेशदेवींनी जगासमोर पोवारी बोलीभाषेचा चुकीचा इतिहास पोचविला-लखनसिंह कटरे
या समेलनातील पवारी भाषा,कला,संस्कृती व संवर्धन या विषयावरील आयोजित परिसवांदाची भूमिका मांडताना महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य लखनसिंह कटरे म्हणाले की,आपण सर्वांनी आधी साहित्याची माहिती जानूण घ्यायला हवे.जोपर्यंत आपल्याला साहित्याची,लेखणाची माहिती कळणार नाही तोपर्यंत साहित्य समजणार नाही. संस्कृत ही नैसर्गिक भाषा नव्हे तर ती वेगवेगळ्या तुटक भाषा व शब्दांना एकत्रित करून तयार झालेली भाषा असून जरी त्या भाषेचे सामाजिक व्यवहारात वापर कमी असले तरी ती आजच्या घडीला महत्वाच्या ठिकाणी पोचली आहे.त्याचप्रमाणे पोवारी बोलीभाषा ही एका महत्वाच्या टप्यावर पोचू शकते,त्यासाठी शब्दसंग्रह साठवून ठेवण्याची गरज आहे.साहित्य जिवन कसे जगावे हे शिकवते साहित्य समजण्यासाठी संस्कृतीची जाणिव हवी.१९१७ मध्ये पहिल्यांदा बोली भाषेचे सर्वेक्षण झाले त्यानंतर तब्बल १०० वर्षांनी २०१५ मध्ये बोलीभाषेचे सर्वेक्षण करण्यात आले.परंतु हे सर्वेक्षण करतांना ज्यां ज्ञानेश्वर टेंभरेंनी पोवारी बोलीभाषेचा इतिहास समोर आणलाच नव्हे तर त्यावर संशोधनही केले,त्या टेंभरेंचा एकही नामोलेख त्या सर्वेक्षणात दिसून येत नाही उलट ज्यांना पोवारी भाषेचा गंधही नव्हता अशा काही लोकांच्या नावाचा उल्लेख पुण्यातील गणेशदेवी व जांगडे यानी त्या ११ पानात पोवारी भाषेचे विश्लेषण करतांना करुन एकप्रकारे सर्वेक्षण करत्यांनी पोवारी भाषेचा चुकीचा इतिहासच जगासमोर मांडला गेल्याचे म्हणाले.
या दरम्यान साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.झाडीबोलीत प्रसिध्द असलेल्या दंडारीचे सादरीकरण करण्यात आले.तसेच पोवारीभाषेतील कवीसमेंलनही घेण्यात आले.पहिल्या उदघाटन सत्राचे संचालन देवेंद्र चौधरी यांनी केले तर आभार बाबा भैरम यांनी मानले.
पोवारी भाषेवर हिंदीपेक्षा भाषिक भाषेंचा प्रभाव
पोवारी भाषेचा जिथपर्यंत प्रश्न आहे तोवर विचार केल्यास या भाषेवर पश्चिम हिंदी व बुंदेली भाषेचाही प्रभाव नसून qहदी भाषेचाही जो प्रभाव असायला पाहिजे होता तो नाही आहे.उलट पोवारी भाषेवर विविध राज्यातील भाषेंचा विचार केल्यास राजस्थानी,गुजराती,मारवाडी व मराठी सारख्या भाषांचा प्रभाव पडल्याचे दिसून येते.
९ व्या शताब्दीपासून ते १४ व्या शताब्दीपर्यंत प्रमर राज होते.मुगलांच्या त्रासामुळे पवार,प्रमरांनी मराठ्यांना साथ दिली.१७२४-१७२५ च्या काळात बाजीराव पेशव्याने उदाजी पवार या सरदाराला चौथ वसुलीसाठी मालवा प्रदेशातील धार येथे पाठविले.त्यावेळी मुगलसोबतच्या लढाई झाली.१७३२ मध्ये धार स्वतंत्र्य राज्य झाले ते १९४७ पर्यंत स्वतंत्र राज्याच्या रुपातच होते.११९० मध्ये शहाबुद्दी गौरीच्या नेतृत्वातील मुगल सेनेने जेव्हा उज्जैनवर आक्रमण केले त्यावेळी पवार राजा मित्रसेन होते.वारंवारच्या आक्रमणामुळे राजाभोज ने उज्जैन सोडून दिले.पवार इतिहास मोठा असून इस १७०० च्या जवळपास औरंगजेबच्या अत्याचाराने त्रस्त होऊन गोंडराजा बख्त बुलंदशहाच्या आश्रयस्थानाला आले.त्यांनी आश्रय देत जंगलात शेती करण्यास सुरवात केली व काही काळानंतर मालगुजारी रुपात गावे दिली.मराठा कार्यकाळात पवार समाज याभागात स्थायी झाला

**********

Report : Vinita Thakre

Marathi News : Tirora City, Gondia

News Desk : Khabar 24 Express

Please follow and like us:
189076

Check Also

15 घंटे बारिश में फंसी रही Mahalakshmi Express, चारों तरफ पानी-पानी, यात्रियों को लगा कि अब Train डूब जाएगी

मुम्बई समेत आसपास के इलाकों में जबरदस्त बारिश से जलभराव, बदलापुर में आफत की बारिश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy khabar 24 Express? Please spread the word :)