Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भाग्यवेद अकॅडमीचा सन्मान गुणवंतांचा व करिअर मार्गदर्शनाचा उत्कृष्ट कार्यक्रम

भाग्यवेद अकॅडमीचा सन्मान गुणवंतांचा व करिअर मार्गदर्शनाचा उत्कृष्ट कार्यक्रम

भुसावळातील संपूर्ण तालुक्यातील इयत्ता १० सीबीएससी व स्टेट बोर्ड मधून 85% गुण उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा भुसावळातील भाग्यवेद अकॅडमी तर्फे सन्मान गुणवंतांचा व करिअर मार्गदर्शन हा कार्यक्रम घेण्यात आला तसेच त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले. यावेळी प्रा. एन. पी निळे यांनी १० वी नंतर कोणकोणते पर्याय आपल्याला उपलब्ध असतात त्याविषयी मार्गदर्शन केले.
NEET, JEE आणि CET, NDA अशा अनेक शैक्षणिक वाटा आहे असेही त्यांनी सांगितले तर भाग्यवेद अकॅडमी च्या संचालिका सौ. राजेश्वरी निळे यांनी ज्या विद्यार्थ्यांना 90% च्या वर गुण असतील त्यांना १०००० रुपयाची स्कॉलरशिप आणि ज्या विद्यार्थ्यांना 85% वर गुण असतील त्यांना ५००० रुपयाची स्कॉलरशिप भाग्यवेद अकॅडमी तर्फे देण्यात येईल असं सुद्धा त्यांनी जाहीर केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले नहाटा कॉलेजचे प्रा. डॉ बी.एच. बऱ्हाटे यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व जे काही कराल ते आपल्या आवडीचे करावे आवडी निवडीनुसार करावे असं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमात 110 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe