Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये शिवजयंतीनिमित्त पोवाडा, नृत्य व नाट्य सादरीकरणाने रंगला कार्यक्रम

ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये शिवजयंतीनिमित्त पोवाडा, नृत्य व नाट्य सादरीकरणाने रंगला कार्यक्रम

Bhusawal Breaking News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या प्राचार्या नीना कटलर यांनी दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी इयत्ता सातवीचा विद्यार्थी निनाद चौधरी याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी माहिती दिली, तर इयत्ता चौथीतील विधिका शंकपाल हिने त्यांच्या पराक्रमावर आधारित पोवाडा सादर केला.


तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी आकर्षक नृत्य सादर केले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी विविध वेशभूषेत जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, मावळे आणि अफजल खान यांच्या प्रसंगांवर आधारित नाट्यप्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली.


कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात विद्यार्थ्याला घोड्यावर बसवून शाळा परिसरात मिरवणूक काढण्यात आली. प्राचार्या नीना कटलर यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचे प्रेरणादायी विचार सांगितले.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्राचार्या मनप्रीत कौर, श्रद्धाली घुले तसेच सोनाली मुजुमदार, स्मिता जाधव, अर्जुन सनस, सोनिया टेकवाणी, मोहम्मद अकीब, जेम्स फ्रान्सिस, युवराज जाधव, अनघा पाटील आणि मुकेश कोळी यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माया सोनोने व शीतल बुला यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्या नीना कटलर यांनी मानले.
या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

मुझे छोटी बहन समझकर माफ कर दें… लद्दाख में जवानों से भिड़ने वाली 25 साल की Gen Z पर्यटक ने मांगी माफी

मुझे छोटी बहन समझकर माफ कर दें... लद्दाख में जवानों से भिड़ने वाली 25 साल की Gen Z पर्यटक ने मांगी माफी

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading