Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

सामाजिक क्षेत्रातील निरंतर आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत, भुसावळ येथील ॲड. सागर सतीश सरोदे यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.
जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे आयोजित भव्य सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
जनमत प्रतिष्ठान आणि मुक्ताई महिला बहुद्देशीय संस्था, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये विशेषतः
- राजू मामा भोळे (आमदार, जळगाव शहर)
- गायत्रीताई भंगाळे (लोकनियुक्त नगराध्यक्ष, भुसावळ)
- दीपमाला काळे (महापौर, जळगाव)
- जयश्रीताई महाजन (माजी महापौर)
- निलकंठ गायकवाड
- प्रा. रफिक शेख
तसेच जनमत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंकज नाले, मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, भारतीताई काळे, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार आणि ॲड. निखिल पाटील यांच्या हस्ते ॲड. सरोदे यांचा सन्मान करण्यात आला.
सामाजिक कार्याचा गौरव
ॲड. सागर सरोदे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून देत सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
“हा पुरस्कार म्हणजे माझ्या सामाजिक जबाबदारीची पावती आहे. भविष्यातही वंचितांच्या न्यायासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी माझे कार्य अधिक जोमाने सुरू राहील,” अशी भावना ॲड. सागर सरोदे यांनी व्यक्त केली.
या सन्मानामुळे भुसावळ शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7